Amravati Belora Airport Midnight Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

Amravati Accident News : अमरावतीच्या बेलोरा विमानतळ परिसरात मध्यरात्री कार आणि दुचाकीच्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीत मध्यरात्री भीषण अपघात

  • कार-दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

  • तिघेजण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

Amravati Belora Airport Midnight Accident 3 Dies अमरावतीच्या बेलोरा विमानतळ परिसरात भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कार आणि दुचाकीच मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनास्थळी नेमकं काय घडलं? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यात भीषण अपघातात फुटबॉलपटूचा मृत्यू

पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये १९ वर्षीय राष्ट्रीय फूटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. महंमदवाडी हद्दीतील क्लाऊड नाइन परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

कसा झाला फुटबॉलपटूचा अपघात?

दुचाकीला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील फुटबॉलपटू खाली पडला. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. आरिफ शेख असे मृत तरुणाचे नाव होते. आरिफ शेख फुटबॉल चॅम्पियन होता. तो कोंढव्यातील पारगेनगरमध्ये राहत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : सावधान! उन्हाळ्यात अचानक ब्लड प्रेशर वाढतो? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT