Amravati Accident Saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident : पेरणी करताना दुर्दैवी घटना; ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळले, चालकाचा बुडून मृत्यू

Amravati News : रवींद्र वाघाडे यांच्या शेतात विहीर खोदकाम करण्यात आले आहे. विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी देखील लागले आहे. मात्र विहिरीच्या आजूबाजूला पक्के बांधकाम करण्याचे काम बाकी आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे  

अमरावती : पाऊस पडल्यामुळे सध्या शेतात पेरणीच्या कामांची लगबग सुरु आहे. अशात ट्रॅक्टरद्वारे पेरणीचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत पेरणी करत असताना शेतात खोदण्यात आलेली विहीर न दिसल्याने चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यात विहिरीत बुडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीत सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. यात संजय भाकरे या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मॉन्सूनचा पाऊस आल्याने शेतात पेरणीच्या कामाची लगबग पाहण्यास मिळत आहे. शक्य आहे अशा ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टर लावून त्याद्वारे पेरणीचे काम करत आहे. त्यानुसार रवींद्र वाघाडे यांच्या शेतात पेरणीच्या कामासाठी संजय भाकरे हे ट्रॅक्टर घेऊन गेले होते. 

विहीर न दिसल्याने झाला घात 

दरम्यान रवींद्र वाघाडे यांच्या शेतात विहीर खोदकाम करण्यात आले आहे. विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी देखील लागले आहे. मात्र विहिरीच्या आजूबाजूला पक्के बांधकाम करण्याचे काम बाकी आहे. याच शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी सुरु होती. मात्र चालक संजय यांना विहीर नजरेस पडली नाही. यात अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत पाणी असल्याने चालकाला बाहेर निघता न आल्याने बुडून मृत्यू झाला. 

अनियंत्रित बस झाडाला धडकली, सात प्रवासी जखमी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगाराची बस बेलोरा या गावी जात असतांना चिंधादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. रात्रीच्या सुमारास झालेल्या बस अपघातात चालक, वाहकासह सात लोक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातही जखमींना चांदूर रेल्वेवरून अमरावती रेफर करण्यात आले. तर बसमधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Quick Breakfast Recipes : ना गॅसची गरज ना जास्त वेळ, झटपट बनणाऱ्या 'या' ५ रेसिपी नाश्त्याला ट्राय करा

Pravin Tarde- Deool Band 3 : राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन; 'देऊळ बंद ३' येणार, गश्मीर महाजनीची दमदार एन्ट्री | VIDEO

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, खरातच्या साथीदाराकडून ED ने एकाच दिवसात जप्त केले १३.५० कोटी रुपये

NEET चा पेपर फुटलाच नाही, संसदीय समितीसमोर NTAचा अजब दावा

Rajya Sabha Election: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेवर कोणाची लागणार वर्णी? बड्या नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT