Amol Mitkari - Gopichand Padalkar - Chulivarcha Baba Saam TV
महाराष्ट्र

Amol Mitkari Tweet: अमोल मिटकरींकडून गोपीचंद पडळकरांची थेट चुलीवरच्या बाबाशी तुलाना; म्हणाले, हा गोप्या म्हणजे भट्टीच्या...

साम टिव्ही ब्युरो

Amol Mitkari Vs Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसतात. टीका करत असताना पवार कुटुंब त्यांच्या निशान्यावर असल्याचं पहायला मिळतं. रविवारी पुन्हा एकदा पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका केली. त्यावर आता अमोल मिटकरी चांगलेच संतापले आहेत.अमोल मिटकरींनी गोपीचंद पडळकरांती तुलना थेट चुलीवरच्या बाबासोबत केली आहे. (Amol Mitkari)

हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मिटकरी पुढे म्हणाले की, " पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अशी आगपाखड मिडकरींनी गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) केली आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

काल झालेल्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकरांनी हर्षवर्धन पाटलांविषयी सूचक वक्तव्य केलं होतं. हर्षवर्धन यांना लोकसभा निवडणूकीसाठी बारामतीमधून भाजपचं तिकीट मिळेल असा उल्लेख पडळकरांनी अप्रत्यक्षपणे केला.

" राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे बारामती. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. ते आज आपलं नेतृत्व आहेत. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून पक्ष कुणाला तिकीट देणार हे मला माहिती नाही. मात्र ज्याला हे तिकीट मिळेल, तो भाग्यवान असेल. कारण पवारांचा पराभव करत संसदेत जाण्याची संधी त्या व्यक्तीला मिळणार आहे.", असं पडळकरांनी यावेळी म्हटलं होतं. पडळकरांच्या याच वक्तव्यावरून अमोल मिटकरी त्यांच्यावर बरसले आहेत. त्यांनी केलेलं ट्विट देखील आता चर्चेत आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT