Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीत ठिणगी? अजित पवारांनी बाहेर पडावं, NCP नेत्याचं खळबळजनक विधान, VIDEO

prakash ambedkar vs ajit pawar : विधानसभेसाठी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी स्वत:च्या पक्षाकडे केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार गटावर टीका झाली. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला एकटं पाडलं जात आहे, असा आरोप काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी स्वत:च्या पक्षाकडे मोठी मागणी केली. विधानसभेसाठी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी स्वत:च्या पक्षाकडे केली आहे.

अमोल मिटकरी यांनी अकोल्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमोल मिटकरी यांनी स्वत:च्या पक्षाकडे मोठी मागणी केली. 'अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, 'नव्या युतीबाबत आपलं वैयक्तिक मत आहे. तरी पक्षाने यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी काहीही करून महायुती सोडावी, यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही नेते प्रयत्न करत आहेत, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

'काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप मिटकरींनी व्यक्त केला. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील, असा आशावादही मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चारपैकी फक्त एकच जागा जिंकता आली. तर वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडणुकीत जिंकू शकला नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही अकोला लोकसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावं लागलं. आगामी विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT