Amol Mitkari Saam Tv
महाराष्ट्र

माझं काय चुकलं? तिकीट कापताच अमोल मिटकरींचा संतप्त सवाल, थेट कारण विचारले

Amol Mitkari reaction after losing MLC ticket : विधान परिषद तिकीट न मिळाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. “माझं काय चुकलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

Amol Mitkari latest news : विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. "माझ्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही किंवा मला विश्वासातही घेतले गेले नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) विधान परिषद निवडणुकीसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले, "मी झिशान सिद्दीकी यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या निवडीचा मला आनंदच आहे. पण दुःख एकाच गोष्टीचे वाटते की, जर ही जागा झिशान यांना द्यायची होती, तर 'दादां'नी (अजित पवार) किमान फोन करून मला सांगितले असते. की यावेळी तुम्हाला थांबावे लागेल, तुम्हाला एकदा संधी दिली आहे, आता दुसऱ्याला संधी देऊ,' असे सांगून मला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, मला साधा फोनही केला गेला नाही."

माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी २९ जानेवारीलाच केली होती दादा… हरकत नाही. …दादा तुमच्यासाठी 'एक संधी' काय अशा 'हजार संधी' हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील , या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल! अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही,वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल #जान भी देंगे
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

ते पुढे म्हणाले, "आमदारकी झिशान सिद्दीकी यांना देताना वरिष्ठांनी मला विचारात घेतले नाही. मी 'दादां'सोबत शेवटपर्यंत कायम राहिलो, त्यांच्यासाठी लढलो. ही जर माझी चूक असेल, तर अशा चुका करण्याचा मला अभिमानच असेल. आयुष्यात अशा हजार संधी येतील, आयुष्य संपलेले नाही. मी यापुढेही गोरगरिबांचे प्रश्न मांडत राहीन आणि काम करत राहीन. माझे तिकीट का कापले, याचे उत्तर पक्षातील दिग्गजांनी द्यावे," असेही मिटकरी यावेळी म्हणाले.

"पार्लमेंट बोर्डाने बैठक घेतली, हे ठीक आहे. मात्र, त्या जागेवर सध्या कार्यरत असलेल्या आमदाराला किमान एक फोन करायला हवा होता; पण तसे काहीही झाले नाही. मला का डावलण्यात आले, याचे कारण आता पक्षातील वरिष्ठांनीच स्पष्ट करावे. गेल्या सहा वर्षांतील माझ्या कामात काही चूक झाली असेल, तर ती सांगावी. मी सभागृहात तरुण आणि शेतकऱ्यांसह सर्वच महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत. अगदी शेवटच्या अधिवेशनातही अजितदादांच्या बाजूने मी ठामपणे उभा राहिलो. मात्र, ही जागा दुसऱ्याला देताना जर मला साधे विचारलेही जात नसेल, तर याचा काय अर्थ समजावा? पक्षाने मला किमान विश्वासात तरी घ्यायला हवे होते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT