Amol Mitkari Saam Tv
महाराष्ट्र

Amol Mitkari: ...याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता; अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला

Amol Mitkari Post On Rohit Pawar: आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. याच भेटीनंतर अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

Siddhi Hande

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे. महाविकासआघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर आरोप केले आहे. (Amol Mitkari Post)

अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत रोहित पवार यांना 'खोटारडा' म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की, स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय.बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन ,आज मस्तीत बोलतोय.जय,पार्थदादा पैकी कुणी एक जरी कर्जत जामखेड मध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता.#खोटारडा. अमोल मिटकरींनी रोहित पवारांवर आरोप केले आहेत.

आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. त्यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडल्या आहेत. त्याचवेळी रोहित पवारांनी दादा बारामतीत अडकून आहेत. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची ही आपली परंपरा आहे, असं म्हटलं होतं. याचाच व्हिडिओ शेअर करत अमोल मिटकरींनी रोहित पवारांवर टीका केली आहे. (Ajit Pawar)

दरम्यान, अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना म्हटलं की, रोहित थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचं, असा मिश्कील टोला लगावला होता. दरम्यान, याचवरुन रोहित पवारांनी अजित पवारांनी सभा न घेण्याची विनंती केली होती, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. (Amol Mitkari Post On Rohit Pawar)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT