Amol Kolhe Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe : माझे काका नटसम्राट नव्हते; अमोल कोल्हेंचं अजित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर

Amol Kolhe On Ajit Pawar : शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी मी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो आहे, तेही काकांच्या नाही तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर असेही कोल्हेंनी उत्तर देताना म्हटले आहे.

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढंच म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तुत्वाने केलं, माझे काका नटसम्राट नव्हते, अशा शब्दांत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असंही यावेळी अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या कामात सर्वच पक्ष आणि नेते व्यस्त आहेत. यातून सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका होताना दिसतायत. अशात शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसत आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

काल अजित पवार यांनी हडपसरच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं की, तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

यावर प्रत्युत्तर देताना कोल्हे म्हणाले, २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर मी येथे आलो. योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी मी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो आहे, तेही काकांच्या नाही तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर असेही कोल्हेंनी उत्तर देताना म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT