Maratha quota protest intensifies as opposition accuses CM Eknath Shinde of secretly aiding Jarange’s agitation Saam Tv
महाराष्ट्र

Amit Shah’s Strategy: अमित शाहांची खेळी, पुन्हा शिंदेंकडे जबाबदारी ?

Political Storm Over Maratha Quota: मनोज जरांगेंचं आंदोलन हाताळण्याची जबाबदारी अमित एकनाथ शिंदेंवर दिलीय.. मात्र त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात अमित शाहांच्या या नव्या रणनीतीवरचा हा रिपोर्ट

Omkar Sonawane

ओबीसीतूनच आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगेंच्या आंदोलनाची हलगी कडाडली आणि मुंबईत चक्काजाम झालाय.. त्याचीच धडकी सरकारला भरलीय.. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांनी आधी विनोद तावडे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत मराठा आंदोलनावर चर्चा केलीय... एवढंच नाही तर शिंदेंनीच जरांगेंचं आंदोलन हाताळावं, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आहेत. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वीपणे हाताळलं होतं.. त्याच प्रकारे आता सुरु असलेलं आझाद मैदानावरील आरक्षणाचं आंदोलन हाताळण्यासाठी एकनाथ शिंदेंना सूचना दिल्या आहेत..

.

त्यामुळेच गुजरातमधील पटेल आंदोलनासारखं मनोज जरांगेंचं आंदोलन चिघळू नये म्हणून शिंदेंच्या हाती मध्यस्थीचे सूत्र देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.. मात्र आता अमित शाहांच्या सूचनेनुसार एकनाथ शिंदें आंदोलनात मध्यस्थ्याची भूमिका घेणार की शाहांचा दौरा संपताच पुन्हा दरे गावी गणपतीसाठी रवाना होणार? यावर आंदोलनाची दिशा आणि सरकारची दशा ठरण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Duper: रंगणार कौटुंबिक महासोहळा; ललित प्रभाकर-निर्मिती सावंत यांचा नवा चित्रपट 'सुपर डुपर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Matar Pickle : हिरवेगार चटपटीत मटार लोणचे बनवण्याची सोपी ट्रिक, वाचा रेसिपी

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : पैठणमधील 9 पैकी 8 गटावर शिवसेना उमेदवार विजयी

Homemade Face Pack : 'या' 2 घरगुती पदार्थांपासून बनवा फेस पॅक, तुमचे सौंदर्य पाहून लोक म्हणतील,"कश्मीर की कली..."

Crime News : विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीची भर वर्गात गोळ्या झाडून केली हत्या, लॉ कॉलेजमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT