हेच ते कावळ्याचे पिल्लु 
महाराष्ट्र

वसमतच्या अमितने स्विकारले कावळ्याच्या अनाथ चिमुकल्यांचे पालकत्व

वसमत येथील अवघ्या १२ वर्षीय मुलाने चक्क एका कावळ्याच्या अनाथ पिल्याचे पालकत्व स्वीकारून स्वार्थापोटी अंध झालेल्या माणसांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : मनुष्य हा प्राण्यामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी पण स्वतः च्या गरजेपोटी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी करत असल्याने जंगलक्षेत्र कमी होत चालले आहे. कावळाच नव्हे तर इतरही वन्यजीव व वन्यपक्ष्यांचे नैसर्गिक पर्यावास धोक्यात आल्याने त्यांना नाईलाजाने अन्न व निवारा या किमान गरजा भागविण्यासाठी मनुष्यवस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे.

अशावेळी मनुष्याने त्यांना संरक्षण देऊन त्यांच्या संवर्धणासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असले तरीही कमालीचा स्वार्थीपणा बाळगून बुद्धिवान प्राणी म्हणून मिरवणाऱ्या मनुष्याला साफ विसर पडला आहे. मात्र वसमत येथील अवघ्या १२ वर्षीय मुलाने चक्क एका कावळ्याच्या अनाथ पिल्याचे पालकत्व स्वीकारून स्वार्थापोटी अंध झालेल्या माणसांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातले आहे.

हेही वाचा - औरंगाबाद येथील सातारा परिसरात राहणारे योगेश पडोळ हे पत्नी वर्षा, मुलगा श्रेयस व त्यांचे नातेवाईक रामदास शेळके चौघे जण कार ( एम एच २० सीएम १८७२) ने औंढा तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे कार्यक्रम आले होते.

वसमत येथील अमित प्रमोद लोमटे हा १२ वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी सावळेश्वर पोस्ट बीटरगाव ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे मामाच्या गावी गेला होता. तिथे त्याला घरट्यातून खाली पडलेले एका पक्षाचे अनाथ पिल्लू आढळून आले. हे पिल्लू नेमके कुठल्या पक्षाचे आहे हे माहीत नसतानाही त्याने ते पिल्लू घरी आणले. त्यानंतर तो आपल्या गावी वसमतला घेऊन आला व त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. युट्यूब व गुगल वर सर्च करून त्याने त्या पिल्याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली.

त्यानंतर त्याला कळले की ते पिल्लू कावळ्याचे आहे. सुरुवातीचे काही दिवस कावळ्याचे पिल्लू सांभाळू नये म्हणून त्याला घरून थोडा विरोध झाला मात्र अमितने तो विरोध झुगारून त्या असहाय्य पिल्याचे सांभाळ करायचे ठरवले. त्याची प्रबळ इच्छाशक्ती बघून घरच्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. सध्या ८ दिवसापासून स्वतःचा अभ्यास सांभाळून उरलेल्या वेळेत अमित त्या कावळ्याच्या पिल्याला सांभाळत आहे. त्या पिल्याला जेवू घालणे, पाणी पाजणे, त्याचा बिछाना रोजच्या रोज साफ करणे हे अमित आवडीने करत आहे. एवढ्या कमी वयात त्याची ही जिद्द प्रशंसनीय आहे. त्याने स्वेच्छेने स्वीकारलेल्या या अनोख्या पालकत्वाची चर्चा वसमत परिसरात होत असून निसर्गप्रेमीकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

येथे क्लिक करा- जोरदार आलेल्या पावसाने परभणी शहराची दानादान उडाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली

मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी इतर वन्यजीव, पशु- पक्षांबद्दल आपली जबाबदारी विसरत चालला आहे. जे पशु- पक्षी मनुष्याच्या फायद्याची आहेत त्यांना गुलाम करुन पाळीव प्राणी असे गोंडस नाव देऊन त्यांच्याकडून चाकरी करून घेत आहे तर जे प्राणी मनुष्याच्या फायद्याचे नाहीत त्यांना हिंस्र, रानटी प्राणी असे हिणवुन त्यांच्यावर अत्याचार करत आहे.

अमित सारखी मुले याकामी पुढे आली तर नक्कीच वन्यजीवांबद्दल भूतदया दाखवून त्यांचे रक्षण व संवर्धनासाठी मोलाची कामगिरी बजावतील अशी खात्री वाटते. याकामी पालकांनी आपापल्या पाल्याना प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्म विचारसरणी ठेवून त्यांच्या प्रयत्नांना बळ द्यावे.

- विकी दयाळ, निसर्गप्रेमी, सर्पमित्र, वसमत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT