Amboli Crime News Saam TV
महाराष्ट्र

Amboli Crime News: चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं, खोटं आश्वासन देत तरुणीला घातला लाखोंचा गंडा

Crime News: चित्रपटात काम देण्याचं प्रलोभन दाखवत एका तरुणीची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Amboli News: बॉलिवूड आणि त्यावरील लाईमलाईट सर्वांनाच हवीहवीशी वाटते. चित्रपटातील अॅक्शन सीन आणि गाणी पाहून अनेक तरुण-तरुणींना चित्रपटात काम मिळावं असं वाटतं. आपणही अभिनेत्री बनून प्रसिद्धी मिळवावी अशी स्वप्न काही मुली पाहतात. असंच स्वप्न पाहणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलंय. चित्रपटात काम देण्याचं प्रलोभन दाखवत एका तरुणीची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कार्तिक आर्यनच्या लव इन लंडन चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देण्याचे सांगून आरोपीने फिर्यादी तरुणीची तब्बल 82,75,000/- रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी फिर्यादी तरुणीने आरोपी कृष्णा शर्मा विरोधात मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी कृष्णा शर्मा आणि फिर्यादी हे एकमेकांच्या परिचित आहेत.आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असून आपली अनेक मोठ्या कलाकार आणि निर्मात्यांसोबत ओळख असल्याचे फिर्यादीने तरुणीला सांगितले. कार्तिक आर्यन याच्यासोबत तुमची ओळख करून देतो आणि त्याच्या आगामी लव इन लंडन या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रोल मिळवून देतो असे सांगून कृष्णा शर्मा याने तरुणीला विश्वासात घेतले.

तसेच ही फिल्म प्रोड्युस करण्याची जबाबदारी देखील तरुणीला देण्याचे कबूल केले. यासाठी काही आथिर्क जबाबदारी देखील घ्यावी लागेल असे सांगून आरोपी कृष्णा याने तरुणीकडून तब्बल 82,75,000/- एवढी रक्कम घेतली.

रक्काम घेतल्यावर चित्रचं पालटलं. ना कार्तिक आर्यनसोबत भेट घडवून आणली, ना चित्रपटात काम मिळाले. ना फिल्म प्रोड्युस करण्याचे काम मिळाले.म्हणून तरुणीने कृष्णा शर्माकडे पैशासाठी तगादा लावला मात्र कृष्णाने अद्यापही पैसे दिले नाहीत.

त्यामुळे तरुणीने कृष्णा शर्मा विरोधात मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार आंबोली पोलिसांनी भादवी कलम 406 आणि 420 नुसार कृष्णा शर्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कृष्णा शर्मा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आंबोली पोलिसांकडून आरोपी कृष्णा शर्मा याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT