Crime News Latest News SAAM TV
महाराष्ट्र

शुटींग बघायला गेली, नराधमानं दुकानात डांबलं; ११ वर्षीय चिमुकलीवर रात्रभर लैंगिक अत्याचार | Kalyan

11-Year-Old Girl physically Assaulted in Kalyan: कल्याणच्या आंबिवली परिसरात एका ११ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

एका अकरा वर्षीय मुलीला दुकानात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही संतापजनक घटना कल्याणजवळील आंबिवली परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित मुलगी कल्याण जवळील आंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तिचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पाच मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही.

पीडित मुलीच्या कुटुंबाने शोधाशोध केली. मात्र, ती काही सापडली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलगी घराच्या परिसरातच आढळली आहे. कुटुंबाने विचारपूस केली असता, तिने अतिप्रसंग घडल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाच्या सदस्यांची पायाखालची जमीन सरकली.

नेमकं घडलं काय?

आंबिवली येथील नदीकिनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी पोहोचली. नदीच्या परिसरातच गणेश म्हात्रे या नराधामाचे किराणामालाचे दुकान होते. गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली त्याने तिला दुकानात बोलवले, जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले. मात्र या अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ओढून घेत दुकानाचे शटर बंद करून या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT