Election Board Error in Ambernath Saam TV Marathi News
महाराष्ट्र

अंबरनाथ निवडणुकीत मोठा गोंधळ, चिन्हाखाली पक्षांची नावंच गायब; उमेदवार अन् नागरिकांमध्ये संभ्रम

Election Board Error in Ambernath: अंबरनाथ नगरपालिका सार्वजनिक निवडणूक २०२५ला सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नागरिक व उमेदवारांना कोणत्या पक्षाचे कोणते चिन्ह आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहितीफलक उभारण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

  • अंबरनाथ निवडणुकीत गोंधळ

  • उमेदवार व नागरिकांमध्ये संभ्रम

  • चिन्हाखाली पक्षांची नावे गायब

अजय दुधाणे, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. सर्वत्र राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्ष बळकटीसाठी बड्या नेत्यांकडून विविध उपाययोजना राबवले जात आहे. अशातच अंबरनाथ नगरपालिका सार्वजनिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू आहे. दरम्यान, नागरिक आणि उमेदवारांना पक्षांची चिन्हे स्पष्ट ओळखता यावीत म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहितीफलक लावण्यात आला आहे. मात्र, या फलकावर गंभीर चुका दिसून येत आहे.

राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांमध्ये भाजपचे कमळ, काँग्रेसचा हात, बहुजन समाज पक्षाचा हत्ती, कम्युनिस्ट पक्षाची चिन्हे यांचा उल्लेख व्यवस्थित करण्यात आला असला, तरी एका झाडू चिन्हाचा उल्लेख पक्षाच्या नावाविना दाखवण्यात आला आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे ही निवडणूक ज्या महाराष्ट्र राज्यात होत आहे, त्या राज्यातील राज्यस्तरीय पक्षांच्या चिन्हांखाली त्यांच्या पक्षांची नावे अजिबात दिलेली नाहीत. त्यामुळे घड्याळ कुणाचे? धनुष्यबाण कुणाचा? मशाल कुणाची? रेल्वे इंजिन कुणाचे? तुतारी वाजवणारा माणूस कोणत्या पक्षाचा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

स्थानिक पक्षांची ही माहिती न दिल्याने नागरिक, कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, इतर राज्यातील पक्षांची चिन्हे मात्र, त्यांच्या नावांसह स्पष्ट दाखवण्यात आली आहेत. ही बाब देखील आश्चर्यकारक ठरत आहे. दरम्यान, माहितीफलक तयार करताना दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...नाहीतर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी

Sleep Facts: स्वप्नात ओरडलो तरी आवाज निघत नाही? असं का होतं?

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

SCROLL FOR NEXT