Ambernath news  saam tv
महाराष्ट्र

अंबरनाथ पालिकेत जोरदार राडा; शिंदे गटातील बंडखोर आमदाराला करावा लागला महिला शिवसैनिकांचा सामना

शिवसैनिक महिला आणि शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर समोरासमोर आल्यानं त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची पहायला मिळाली.

अजय दुधाणे

अंबरनाथ : सूरत, गुवाहाटी, गोवा असं भ्रमण करत शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्याजागी राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं आहे. शिंदे गटातील सर्वच बंडखोर आमदार हे स्वत:च्या मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी दैंनदिन कामाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज, बुधवारी अंबरनाथमध्ये (Ambernath) शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना महिला शिवसैनिकांच्या रोषाला सामारे जावं लागलं आहे. महिला शिवसैनिक आणि शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर समोरासमोर आल्यानं त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची पहायला मिळाली. ( Ambernath News In Marathi )

अंबरनाथ पालिकेत आमदारांनी विकासकामांबाबत पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याही शहरातील समस्या घेऊन पालिकेत आल्या. मात्र, यावेळी अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आधी आमदारांना वेळ दिल्याने महिला कार्यकर्त्या या बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर संतापल्या. बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकरांचा गट आणि महिला शिवसैनिकांचा गट आमनेसामने आल्याने अंबरनाथ पालिकेत काही वेळेसाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

यावेळी एका महिला शिवसैनिकानं माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'डॉ. बालाजी किणीकर हे स्वत:ला शिवसेनेचे असल्याचे सांगत आहेत. दगडाला शेंदूर फासतात, त्याप्रमाणे त्यांना निवडणुकीत उभं केलं होतं. आम्हा महिलांच्या प्रत्येक विभागातल्या समस्या आहेत. आम्हा महिलांना नेहमी डावललं जातं. याआधीपासून आमचा आरोप आहे. आज किणीकर यांनी बैठक आयोजित करून वेगळा गट केला. आम्हाला बोलावण्यात देखील आलं नाही.

आम्ही महिला शिवसैनिकांनी आमदार किणीकरांचा निवडणुकीत प्रचार केला, ते केवळ त्यांच्या गटामुळे निवडणून आले नाहीत'. दरम्यान, बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr Balaji Kinikar) यांनी या महिला शिवसैनिकांच्या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कुणी निवडून आणलं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे जे लोक म्हणत आहे की, दगडला शेंदूर फासून आमदार केलं ते बालिश असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT