Ambarnath News  Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath : बाप्पा समोरील मोदकाची तब्बल १ लाख ८५ हजारांची बोली; अंबरनाथमध्ये मोदकांचा लिलाव

Ambarnath News : मोदक जो भाविक विकत घेतो, त्याची भरभराट होते, अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. यातून भाविक मोठ्या संख्येने मोदक खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळेच अगदी पैसे नसले, तरी लावतात बोली

अजय दुधाणे

अंबरनाथ : दहा दिवस गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर काल लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. या दरम्यान अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाची लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मोदकांचा तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला.

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची काल म्हणजे अनंत चतुर्दशीला सांगता झाली. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांकडून काही परंपरा जपल्या आहेत. यात अंबरनाथमधील खाटूश्याम मित्र मंडळाकडून बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदा मंडळाचे ३३ वे वर्ष आहे. मंडळाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यासोबत मोदकांचा लिलाव करण्याची परंपरा सुरु केली आहे. 

बाप्पाजवळ दोन दिवस ठेवला जातो मोदक  

या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पा जवळ ठेवला जातो. या मोदकाचा अनंत चतुर्दशीला लिलाव केला जातो. हा मोदक जो भाविक विकत घेतो, त्याची भरभराट होते, अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. यातून भाविक मोठ्या संख्येने मोदक खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळेच अगदी पैसे नसले, तरी लोक जुळवाजुळव करून या मोदकासाठी बोली लावतात. 

पावणे दोन लाखांची लावली बोली 

यावर्षी अनामिका त्रिपाठी यांनी हा मोदक लिलावात विकत घेतला. तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावत विकत घेतलेला हा मोदक त्यांनी त्यांचे वडील प्रमोदकुमार चौबे यांना भेट दिला. तर हा मोदक विकत घेणाऱ्यांवर बाप्पाची वर्षभर कृपादृष्टी राहते, असा विश्वास यावेळी खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara: नाचताना स्टेज अचानक कोसळला, शिंदेंच्या आमदारासह पदाधिकारी खाली पडले; VIDEO व्हायरल

Chana Gravy Recipe : टिफिनसाठी बनवा चमचमीत चण्याची रस्सा भाजी, एक घास खाताच मित्रमंडळी होतील खुश

Skin Tightening: ३० वर्षातच चेहरा म्हातारा दिसतोय? त्वरित फेस ग्लो करण्यासाठी खास टिप्स

Sperm Count: चाळीशीनंतरही स्पर्म काउंट वाढवायचा आहे? करा 'या' गोष्टी

Government Jobs : तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती, कसा अर्ज कराल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT