Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Ambenali Ghat Accident latest news : आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. पर्यटकांची स्कॉर्पिओ ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Ambenali Ghat Scorpio accident latest update : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ जीप अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत जीपमधील ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी आहे की गाडीतील ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शोध आणि बचाव पथकाने तातडीने दरीत उतरून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. ५०० ते ७०० फूट खोल दरीतून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरी अत्यंत खोल असल्याने गाडी आणि उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ जीप साताऱ्यातील आसगाव (तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, खोल दरी आणि कठीण भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.

२०१८ च्या महाभयंकर बस दुर्घटनेची आठवण ताजी

ज्या परिसरात हा अपघात घडला आहे, त्याच ठिकाणी २०१८ मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरात हा स्कॉर्पिओ जीपचा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले अून युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : बीड पुन्हा हादरले! संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; दोरीने बांधून तरुणाला बेदम मारहाण, दुकानातच केला खून

Maharashtra News Live Update: राज्यात आज मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT