Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याचा प्रकार; रस्त्यात ठेवला लिंबू दोरा, नागरिकांमध्ये घबराट

Ambarnath : अंधश्रद्धेतून काहीजण अघोरी प्रयोग करत असतात. त्यानुसार अंधाऱ्या रात्रीत रस्त्याच्या मधोमध सुपामध्ये लिंबू दोरे आणि इतर वस्तू ठेवून दोन विकृत व्यक्ती ताबडतोब पसार झाले.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंधश्रद्धेतून जादूटोणा, अघोरी विद्या केले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार (Ambarnath) अंबरनाथ शहरात समोर आला असून रात्रीच्यावेळी रस्त्याच्या मधोमध लिंबू, दोरा ठेवण्यात आले आहेत. या प्रकाराने नागरिक भयभीत झाले आहेत. 

आपली पनौती (पनवती -इडा पिडा) दुसऱ्यावर टाकण्यासाठी अंधश्रद्धेतून काहीजण अघोरी प्रयोग करत असतात. त्यानुसार अंधाऱ्या रात्रीत रस्त्याच्या मधोमध सुपामध्ये लिंबू दोरे आणि इतर वस्तू ठेवून दोन विकृत व्यक्ती ताबडतोब पसार झाले. अंबरनाथमधील शिवगंगा नगरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकार पाहून तेथे नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. मात्र हा प्रकार पाहून काहीजण घाबरून दूर पळू लागले. तर हे पाहून रस्त्यातील वाहनांनी, व्यक्तींनी आपले मार्ग बदलले. 

अंधश्रद्धेच्या विरुद्ध अंबरनाथ (MNS) मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांची जनजागृती आणि निषेध व्यक्त करत अन्नघटकही असल्याने सुरसे यांनी स्वतः ते उचलून वाहत्या पाण्यात सोडून आले. या प्रकाराने शिवगंगा नगर मध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान अंबरनाथ शिवगंगा नगरमधील हि घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT