Ambarnath municipal election bogus voters allegation :राज्यातील २३ नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी राज्यभरात मतदान होत आहे. मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. ठाणे, पुणे, यवतमाळ, जालन्यासह राज्यातील उर्वरित नगर परिषदेसाठी मतदान होतेय. आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. पण अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर बोगस मतदार आणि पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात शेकडो महिला असल्याचा आरोप केला आहे.
अंबरनाथमध्ये हजारोच्या संख्येने बोगस मतदार असल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेना शिंदें गटाने हे सर्व बोगस मतदार आणले आहेत, असा आरोप केला जातोय. एका पुढार्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या आहेत. याचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड केलाय. काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर मंगल कारल्याच्या बाहेर पहारा दिला. याचे फोटो अन् व्हिडिओ समोर आलेत.
अंबरनाथ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. पण त्याआधीच शुक्रवारी रात्री राजकीय राडा पाहायला मिळाला. अंबरनाथमध्ये बोगसमध्ये मतदान अन् पैसे वाटल्याचा आरोप कऱण्यात आलाय. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन जणांना पैशाची पॉकिट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचा दावा कऱण्यात येत आहे. या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
तुतारीचे बटन दाबल्यानंतर अडकून बसत असल्याने हिंगोलीच्या वसमत शहरातील महिला आदर्श मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये मतदान प्रक्रिया सुरू होताच गोंधळ पाहायला मिळाला आहे. दरम्यान तांत्रिक अडचण झाल्याने केंद्र अध्यक्षांनी आता नवीन मतदान यंत्र या मतदान केंद्रावर मागवले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.