Ambarnath Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Ambarnath News : धारदार शस्त्राने हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. मात्र घटनास्थळी काहीच घडले नसल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथच्या जावसई गावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. मात्र या घटनेत धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. दरम्यान हल्ला करण्यात आल्याचा प्रकार खोटा असल्याचे उघड झाले असून, हा हल्ला खुद्द जखमी तरुणानेच मित्राच्या मदतीसाठी स्वतःवर करून घेतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासातून झाला आहे.

अंबरनाथच्या जावसई गावात समोर आलेल्या घटनेत अजित चौहान या बिगारी काम करणाऱ्या तरुणाने दोन दिवसांपूर्वी आदित्य जैस्वार आणि त्याच्या वडिलांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. मात्र घटनास्थळी काहीच घडले नसल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. यामुळे पोलिसांनी दुसऱ्या बाजूने तपासाला सुरवात केली. 

या कारणातून रचला बनावट हल्ल्याचा कट 

यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, अजित चौहान याचा मित्र आकाश गुप्ता याच्यावर आदित्यच्या बहिणीने विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यातून सूड घेण्यासाठी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनु कश्यप, आदित्य जैस्वार व अजित चौहान यांनी कट रचून बनावटीचा हल्ला घडवून आणल्याची माहिती तपासात समोर आली. 

सहा जणांवर गुन्हा दाखल 

या प्रकरणात कट रचणाऱ्या सर्व सहा तरुणांवर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT