Ambarnath Crime News
Ambarnath Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

तिचं काय चुकलं? ३ वर्षाच्या चिमुकलीला आसरा देवूनही महिला बनली आरोपी; नेमकं काय घडलं?

अजय दुधाणे

अंबरनाथ : ३ वर्षीची चिमुकली आराधना आई घरात नसताना घराबाहेर पडली. गर्दीच्या परिसरात ती हरवून गेली. दरम्यान, रानमेवा विकणाऱ्या एका महिलेला आराधना दिसली. या चिमुकलीला आपलं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं. त्यामुळं महिलेनं आराधनाच्या आई वडिलांचा शोध घेतला. इतकंच नाही तर, तिने या आराधनाला खाऊ आणि चप्पल सुद्धा घेऊन दिली. पोटच्या लेकराप्रमाणे तिने आराधनाचा सांभाळ केला. संध्याकाळपर्यंत वाट पाहूनही आराधनाला घेण्यासाठी कुणीही न आल्याने ती महिला आराधनाला घेऊन तिच्या गावी घेऊन गेली. इकडे आराधनाच्या आई वडिलांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आराधनाचा शोध घेत सदरील महिलेसह तिच्या पतीला अटक केली. (Ambarnath Latest Marathi News)

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधून समोर आला आहे. एका घराबाहेर पडलेल्या चिमुकलीचा सांभाळ करणाऱ्या महिलेलाच पोलिसांनी अटक केली आहे. अंबरनाथमध्ये सोमवारी एका ३ वर्षीय चिमुकलीची अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या मुलीला पोलिसांनी शोधून काढत पुन्हा तिच्या आईच्या ताब्यात दिलं. ज्या महिलेनं तिला आपल्या घरी नेलं होतं, तिला अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बी केबिन रोडवरील दत्त कुटीर परिसरात एंजल विकी मुर्गेश ही महिला तिच्या तीन मुलांसह राहते. अंबरनाथ नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एंजल या घरात एकट्या कमावणाऱ्या आहेत. त्यामुळं आपल्या मुलांना घरी ठेवून त्या कामावर जातात. दररोज सकाळी जाऊन दुपारी मुलांच्या जेवणाच्या वेळेपर्यंत एंजल मुर्गेश या घरी परत येतात. मात्र सोमवारी अंबरनाथ शहरात शासकीय कार्यक्रम असल्यानं पालिकेतील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत ऑन ड्युटी राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळं एंजल मुर्गेश या सुद्धा रात्री ८ वाजेपर्यंत कामावर हजर होत्या.

दरम्यान, त्यांची ३ वर्षांची चिमुकली आराधना ही घराबाहेर पडली. त्यांचं घर स्टेशन परिसरातच असल्याने आराधना ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. चौकात रानमेवा विकणाऱ्या जान्हवी वाघमारे या महिलेला ती दिसली. त्यामुळं तिने या चिमुकलीला खाऊ घेऊन दिला, चप्पल घेऊन दिली. संध्याकाळपर्यंत वाट पाहूनही या चिंकळीला घेण्यासाठी कुणीही न आल्याने जान्हवी ही चिमुकल्या आराधनाला कर्जत तालुक्यातल्या तिच्या गावी घेऊन गेली.

दुसरीकडे आराधनाची आई एंजल मुर्गेश या कामावरून परतल्यानंतर आराधना दिसत नसल्यानं त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तत्परतेनं याप्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी ४ पथकं रवाना केली. यानंतर सकाळी रानमेवा विकणारी महिला चिमुकलीला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कर्जतला जाऊन आराधनाला सुखरूप परत आणलं आणि तिच्या आईच्या ताब्यात दिलं. पण यानंतर या चिमुकलीवर मायेचं पांघरुण घालणाऱ्या जान्हवी आणि तिचा पती मनोज वाघमारे या दोघांना मात्र कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी अटक केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT