अंबाजोगाई - मांजरसुंबा महामार्गावर दुचाकीला कारची धडक; फौजीसह एकाच मृत्यू  विनोद जिरे
महाराष्ट्र

अंबाजोगाई - मांजरसुंबा महामार्गावर दुचाकीला कारची धडक; फौजीसह एकाच मृत्यू

उमेश सिरसाट आणि विष्णु शंकर काटे असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

विनोद जिरे

बीड - अंबाजोगाई मांजरसुंबा महामार्गावर दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघात Accident दुचाकीवरील फौजीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आहे. उमेश सिरसाट आणि विष्णु शंकर काटे असे अपघातात मृत्यू Death झालेल्यांची नावे आहेत. उमेश सिरसाट हे फौजी होते. सध्या ते बेळगाव belgaon येथे कार्यरत होते.

हे देखील पहा -

मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून गावी आले होते. मात्र सुट्टी संपूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना नेकनुर पोलीस ठाण्यातून एक लेटर घेणे गरजचे असल्याने ते घेण्यासाठी सायंकाळी उशिरा ते त्यांच्या मित्रासह दुचाकीवर जात होते. यावेळी अंबाजोगाई- मांजरसुंबा महामार्गावर नेकनूर परिसरात त्यांच्या दुचाकीला, पाठीमागुन येणाऱ्या इरटीका कारने जोराची धडक दिली.

या झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांचा मित्र जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते. दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Maharashtra News Live Update: नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

SCROLL FOR NEXT