Beed News, Ambajogai Court
Beed News, Ambajogai Court Saam Tv
महाराष्ट्र

Ambajogai : दिव्यांग युवतीवर अत्याचार, युवकास 25 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

विनोद जिरे

Beed News : दिव्यांग युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबाजोगाई न्यायालयाने (ambajogai court) युवकास (youth) पंचवीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठाेठावली आहे. याबराेबरच संबंधित युवकास तीस हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे.(Maharashtra News)

पीडित दिव्यांग युवतीवर पाच फेब्रुवारी 2021 रोजी अत्याचार करण्यात आला. तिचे आई-वडील शेतात मजुरी कामासाठी गेले होते. दुपारी घरी कोणी नसताना आरोपी पवन विश्वनाथ उखंडे हा घरात घुसला अन त्याने पीडीतेवर अत्याचार करत पलायन केले हाेते.

दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी पवन उखंडे याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार व दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला हाेता. त्यानंतर पवन याच्या विराेधात न्यायालयात दाेषराेपत्र दाखल झाले.

या प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. संजश्री घरत यांच्या न्यायालयात या प्रकरणी झालेल्या अंतिम सुनावणीत आरोपीला दोषी ठरवून त्याला 30 हजार रुपये दंड व 25 वर्षे सक्तमजुरी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी बॅगेत ठेवायला विसरु नका; ऐनवेळी सापडाल अडचणीत

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

SCROLL FOR NEXT