Islampur News : चूक एकाची शिक्षा सर्वांना; इस्लामपुर पोलिसांचा अजब फतवा

हा निर्णय रद्द करावा अशी मागणी हाेत आहे.
sangli, islampur
sangli, islampursaam tv

Sangli : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर - कामेरी नाका येथील ट्रफिक सिग्नलवर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा अजब फतवा पोलिस प्रशासनाने परिसरातील टपरी धारकांना दिला आहे.. एका टपरीचालकाने केलेल्या कृत्याचा त्याला दंड मिळाला आहे. परंतू सर्वच टपरीधारकांना भरउन्हात हातात काठी घेवून उभे रहावे लागत आहे.

sangli, islampur
Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

चूक एकाची व शिक्षा सर्व टपरीधारकांना का? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय चौकातील टपरीधारकांसाठी जीवघेणा ठरु शकतो. हा प्रकार म्हणजे जखम मांडीला अन इलाज डोक्याला असाच आहे.

आठवड्याभरापुर्वी कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था आठवड्यात दोन वेळा खंडित झाली. याची पाहणी केली असता एका टपरीचालकाने ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेची तार तोडल्याचे निदर्शनात आले. कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेच्या तारा तोडण्याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाने तक्रार इस्लामपूर पोलिसांकडे दिली होती. (Maharashtra News)

sangli, islampur
Udayanraje Song Viral : 'तेरे बिना जिया जाये ना' वाढदिनी काेणासाठी म्हटलं उदयनराजेंनी गाणं (व्हिडिओ पाहा)

याप्रकरणी शहा नामक व्यक्तीवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या व्यक्तीची पानपट्टी चौकातून हटवण्यात आली आहे. परंतु या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने ट्रॅफिक सिग्नल परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कामेरी नाका चौकालगत असणार्‍या टपरी धारकांना पाचारण केले आहे.

दररोज दोन टपरीधारकांनी थांबून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा पोलीस प्रशासनाने आदेश दिला आहे. टपरीचालकही पोलीसांच्या आदेशाला विरोध न करता कायमचा पोटावर पाय येण्यापेक्षा एक दिवस वाहतूक व्यवस्थेसाठी भरउन्हात उभा राहून स्वतःची सुटका करताना दिसत आहे.

sangli, islampur
Satara News: पाण्यासाठी महिलांचा सीओंना घेराव, भले अटक झाली तरी चालेल आता मागे हटणार नाही; माजी उपाध्यक्षांचा इशारा

पण वाहतूक व्यवस्थित करताना टपरीधारकांना काही इजा पोचली तर त्याला जबाबदार कोण असा अनुत्तरीत प्रश्न समोर उभा राहिला आहे. त्यामुळे टपरीधारकांवर तोंड दाबून बुक्कयांचा मार सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, लवकरात लवकर हा प्रकार थांबवावा असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com