Ambadas Danve On Chandrashekhar Bawankule saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पगार किती, बोलता किती? गोमूत्राचे टँकर मागवून ठेवा... अंबादास दानवेंचा बावनकुळेंवर पलटवार

Ambadas Danve Tweet: ठाण्यात ठाकेर गटाच्या महिला कार्यकर्त्येला मारहण झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर वार-पलटवार केले जात आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Ambadas Danve On Chandrashekhar Bawankule: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रुग्णलायत जाऊन रोशनी यांची भेट घेतली आणि त्यानतंर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर वार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फडतूस गृहमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर वार-पलटवार केले जात आहे.

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत म्हटले की अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानतंर नेमंक फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती आहे. दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? जे मुख्यमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात? ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला.

उद्धव ठाकरे बावचळले आहेत - बावनकुळे

यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे बावचळले आहेत. निराश व्यक्ती आत्महत्या करायला निघतो, तसं ते राजकीय आत्महत्या करायला निघाले आहेत. भाजप त्यांना सोडणार नाही. जिथे उद्धव ठाकरे जातील, तिथे भाजप विरोध करणार असे बावनकुळे म्हणाले. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे.

'पगार किती, बोलता किती?'

अंबादास दानवे यांनी ट्वीट करून म्हटले की, 'बावनकुळेजी, आपण म्हणता उद्धव साहेबांना बाहेर पडणे मुश्किल होईल. गोमूत्राचे टँकर मागवून ठेवा कारण त्याचा राज्यात तुटवडा पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम मिळेल एखादा. कारण उद्धवसाहेब महाराष्ट्रभर फिरतील आणि तुम्ही ते नंतर शिंपडत बसा. पगार किती, बोलता किती?' असे ट्वीट दानवेंनी केले आहे.

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT