Ambadas Danve Saam TV
महाराष्ट्र

Ambadas Danve: अंबादास दानवेंनी इम्तियाज जलील यांचा घेतला समाचार; म्हणाले, सावरकरांच्या देशप्रेमाचा...

Ambadas Danve On Imtiaz Jaleel: जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे जे आश्वासन देण्यात आले आहेत व जे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत, त्यात देखील मराठ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

Ambadas Danve:

इम्तियाज जलील यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हे विधान चुकीचं असल्याचं म्हणत या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर इम्तियाज जलील यांचे हे विधान सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारे असल्याचे देखील म्हटले आहे.

इम्तियाज जलील ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या पक्षाचे आदर्श मानले जाणारे कासिम रजवी जे निजामाचे प्रमुख होते, त्यांना मराठवाड्यातून मराठ्यांनी पळून लावलं होतं आणि त्यानंतर कासिम रजवी काही नागरिकांचा खून करून पाकिस्तानात पळून गेले होते. सावरकरांनी मात्र आपल्या देशातच आपला देह सोडल्याचे म्हणत दानवेंनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठ्यांचे नेते, असं विधान केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. अशातच अंबादास दानवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा देत त्यांना जर मुख्यमंत्री मराठ्यांचे नेते वाटत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अशा शब्दांत कोपरखळी दिली आहे.

जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे जे आश्वासन देण्यात आले आहेत व जे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत, त्यात देखील मराठ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठ्यांचा मूळ प्रश्न अद्याप देखील कायम असल्याचे म्हणत राज्य सरकारने मराठ्यांची पुन्हा एकदा फसवणूक केली असल्याचे विधान दानवे यांनी केले आहे.

राज्यामध्ये 48 च्या 48 जागा या भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लढविण्यात येणार असून कोणाला किती जागा मिळतील याची मानसिकता आमची तयार झाली आहे, त्यामुळे कोण छोटा आणि कोण मोठा हे न बघता भाजपला त्याचबरोबर गद्दारांना पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीतील मराठवाड्याच्या जागा वाटपा संदर्भातील सर्वांची मानसिकता झाली असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT