Maharashtra Budget Session Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session: मोहित कंबोज कोण? तुमचे जावई आहेत का? जलसंपदा विभागातील कारभारावरून अंबादास दानवेंचा घणाघात

Maharashtra Budget Session: मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पान हलत नाही, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Bharat Jadhav

विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोहित कंबोज यांच्याशिवाय राज्यातील जलसंपदा विभागात पानही हलत नाही. विभागाचा कुठलाही निर्णय मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय होत नाही, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.

कंबोज यांचे नाव घेतल्याने भाजप आमदार प्रसाद लाड आणि दानवे यांच्यात चांगलाच वाद झाला. मोहित कंबोज तुमचे जावई आहेत का? असा सवाल दानवेंनी विचारला. विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दानवे म्हणाले की, आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहित कंबोज घेतो.

दीपक कपूर नावाचे अधिकारी मोहित कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत. मंत्र्‍यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला. विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेत.

यावेळी दानवे म्हणाले, जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहित कंबोज घेत असल्याचं सांगतो. दीपक कपूर नावाचे अधिकारी मोहित कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत. परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही, अशी स्थिती आहे, असा आरोप दानवेंनी केलाय.

हा कंबोज कोण आहे, ग्रामीण भागातील मोठमोठ्या धरणाचे प्रश्न, पाटबंधारे, पाण्याचा प्रश्न याचे निर्णय मोहित कंबोज घेतो. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय. मोहित कंबोज यांचे नाव घेतल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी गोंधळ घातला. त्यानंतर दानवे आणि लाड यांच्या खडजंगी झाली. त्यावेळी आपली बाजू मांडतांना दानवे म्हणाले मी पुरावे देईन, मोहित कंबोज हे जलसंपदा विभाग चालवतात.

मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचे संभाषण तपासून घ्या. सीडीआर तपासा. कंबोज यांना सांगितल्याशिवाय महाराष्ट्रातील कुठले निर्णय होत नाहीत. माझा बोलण्याचा अधिकार आहे. कुठल्याही मंत्र्यांवर आपला आरोप नाही. तर आपण त्या विभागाच्या कारभारावर बोललो आहोत. या प्रकाराची चौकशी सरकारने करावी, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.

त्याचवेळी दानवेंनी भाषणावर आक्षेप करणाऱ्यांनाही सुनावलं. बोलतोय जे जबाबदारीने बोलत आहे. कोणकोणत्या कामात मोहित कंबोजने काय केलं हे सांगू का? फार पुढे गेले तर सगळ्या गोष्टींचे लफडे होतील. एखादे मंत्री, अधिकारी बोलतात हे समजू शकतो, पण मोहित कंबोज कोण आहे? त्याचा संबंध काय, आपल्या भाषणावर आक्षेप घेण्याचं कारण नाही, असं दानवे म्हणाले.

..तो तुमचा जावई आहे का? लाड आणि दानवेंमध्ये खडाजंगी

मोहित कंबोज यांचं नाव घेतल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी गोंधळ घालत त्यांचे भाषण थांबवले. दानवे आपल्या भाषणात सभागृहात असं नाव घेऊ शकत नाही असं लाड म्हणाले. त्यावर दानवे संतापले, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलतो, पुरावे मागतील त्यांना देईन, तुम्ही पुरावे मागणारे कोण, माझे भाषण रोखण्याची तुम्हाला कुणी परवानगी दिली, मोहित कंबोजचं नाव का घेऊ शकत नाही, तो तुमचा जावई आहे का, सभागृहाच्या सदस्यांचं नाव घेऊ शकत नाही परंतु बाहेरच्याचं काही बंधन नाही, असं दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, भीषण पूरस्थिती; मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग; पाहा VIDEO

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT