Ambadas Danve 
महाराष्ट्र

Ambadas Danve: ..म्हणून गडकरींचं नेतृत्व नागपुरातचं संपवलं जातंय; राऊतांनंतर दानवेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Ambadas Danve: संजय राऊत यांच्यानंतर आता आंबादास दानवे यांनी सुद्धा भाजप नेत्यांवर आरोप केलेत. नितीन गडकरी यांचे नेतृत्त्व देशाला मान्य आहे. त्याचमुळे त्यांचं नेतृत्व संपवण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

मुंबई: संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची रीघ ओढत आंबादास दानवे यांनीही भाजपमधील नेत्यांवर निशाणा साधलाय. भाजपमधील नेतेच नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी कार्यरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केलाय.

नितीन गडकरी यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला मान्य आहे, त्यामुळेच त्यांचे नेतृत्त्व नागपुरात संपवलं जात असल्याचा दावा दानवेंनी केलाय. भाजप नेते नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी नागपूरमध्ये मोठी रसद पुरवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. आता राऊतांनी केलेल्या आरोपांची रीघ आंबादास दानवेंनी सुद्धा ओढलीय. यात फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी देखील सामील असू शकतील, त्यामुळे हा चर्चेचा विषय असल्याचं दानवे म्हणालेत.

भाजप नेते नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी नागपूरमध्ये मोठी रसद पुरवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. आता राऊतांनी केलेल्या आरोपांची रीघ आंबादास दानवेंनी सुद्धा ओढलीय. नितीन गडकरी म्हणाले होते की, ५ लाखांनी विजयी झालो तर तो खऱ्या अर्थाने विजय होईल, पण प्रत्यक्षात त्यांना दीड दोन लाखाने विजय प्राप्त झाला होता.

या वेळीही अशी परिस्थिती आहे. दरम्यान निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आणि गटांवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण असतं. पण यावेळी मात्र या गटांवर नियंत्रण न ठेवता त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात कशा पद्धतीने काम करावं अशाच पद्धतीने या यंत्रणांना निर्देश दिल्याचे लक्षात येतं असल्याचा दावा दानवे यांनी केलाय.

नितीन गडकरी यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला मान्य आहे देशाला मान्य आहे म्हणून असं नेतृत्व नागपुरातचं संपवलं पाहिजे. हा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजप करत आहे.त्यात कोण असतील तर नरेंद्र मोदी, अमित शाह फडणवीस सामील असतील, असं दानवे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT