Bhujbals Residence Nashik  x
महाराष्ट्र

Bhujabal Farm House: ड्रोनने भुजबळांच्या घराची टेहळणी; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

Bhujbals Residence Nashik : नाशिकमधून महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसची टेहळणी केली जात असल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

Bharat Jadhav

Chhagan Bhujbal Nashik Farm House Drone Surveillance:

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या घराची ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ड्रोन का उडविण्यात आला होता, याची माहिती संशयिताच्या चौकशीतून समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या घराची ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ड्रोन का उडविण्यात आला होता, याची माहिती संशयिताच्या चौकशीतून समोर आलीय.

मागील शुक्रवारी सायंकाळी नाशिकमधील भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर आला होता. भुजबळ यांच्या घरावर ड्रोन का उडविण्यात आला होता याची माहिती संशयिताच्या चौकशीतून समोर आलीय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव पवन सोनी आहे. भुजबळांच्या फार्मवर ड्रोन उडविल्याचं प्रकरणी ड्रोन ऑपरेटरवर पवन सोनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पवन सोनी याने ड्रोन उड्डाण नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक नो फ्लाईन झोन असल्यानं ड्रोन उडविण्यास बंदी आहे. त्यामुळे सोनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पोलिसांनी या संशियताला ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. लग्न कार्यासाठी ड्रोन उडविल्याची कबुली या संशयिताने दिलीय. गेल्या शुक्रवारी छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानाची ड्रोनद्वारे टेहळणी केली गेली होती, याची माहिती येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अंबड पोलिसांना दिली होती. छगन भुजबळांच्या बंगल्यावर कोणीतरी नजर ठेवत असल्याचा आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला होता.

कोणीतरी भुजबळ यांच्या घराची रेकी करत असल्याचा संशय सुरक्षारक्षकांना आला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पाहणी करत चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी पवन सोनी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक नो फ्लाईन झोन असल्यानं ड्रोन उडविण्यास बंदी असल्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील या गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

SCROLL FOR NEXT