Kolhapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृतदेह शेतात आढळला, घातपाताची शक्यता

पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात गोटखिंडी इथल्या एका तरुणाचा मृतदेह काल रात्री टाकण्यात आला आहे. या तरुणाच्या डोक्यात वाराच्या खुणा आहेत. या तरुणास इतर ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकला आहे. (Maharashtra News)

आज (गुरुवार) सकाळी पोलीस पाटील महादेव कुंभार यांनी याबाबतची वर्दी कागल पोलिसांना दिली. त्यानंतर कागल पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करताना या तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले.

त्यावरून अमरसिंह दत्ताजीराव थोरात (amarsinh thorat) (वय ३८) राहणार गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली असे या तरुणाचे नाव असल्याचे समजले. कोल्हापूर इथल्या शहाजी लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात अमरसिंह शिकत असल्याचे समजते.

दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी एक चार चाकी गाडी थांबल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे याचवेळी हा मृतदेह या गाडीतून शेतात टाकला असण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्ह्यात उस दराची पहिली ठिणगी

Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT