Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: खांबावर दुरूस्‍ती करताना लागला शॉक; वरिष्‍ठ विज तंत्रज्ञाचा मृत्‍यू

खांबावर दुरूस्‍ती करताना लागला शॉक; वरिष्‍ठ विज तंत्रज्ञाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : परिसरात विद्युत लाईनची समस्‍या असल्‍याने ही समस्‍या सोडविण्यासाठी महावितरणचे (Mahavitaran) विज तंत्रज्ञ हे खांबावर कामासाठी चढले होते. काम करत असताना त्‍यांना विद्युत करंट (Electric Shock) लागल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. (Breaking Marathi News)

महावितरणचे वरिष्ठ वीज तंत्रज्ञ कैलास कोचे यांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला. कोचे हे पन्नालाल नगर वीज केंद्रावर कार्यरत होते. दरम्‍यान आज सकाळी अकरा वाजेच्‍या सुमारास कोचे हे वीज खांबावर दुरुस्तीच्‍या कामासाठी चढले होते. काम करत असताना त्‍यांना विजेचा जबर शॉक लागला. यात कोचे यांचा जागीच मृत्यू झाला.

नातेवाईक, कर्मचाऱ्यांची गर्दी

विजेचा धक्‍का लागल्‍यानंतर अन्‍य कर्मचारींनी विद्युत पुरवठा खंडीत करून कोचे यांना खाली उतरवत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले. कोचे यांच्‍या मृत्‍यूची बातमी समजताच वीज कर्मचारी तसेच त्‍यांच्‍या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai: खरंच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार का? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगतिलं...

आईची अस्थी घेऊन जाताना कारचा अपघात; भरधाव बसची मागून धडक, २ सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

Meditation Benefits: दररोज सकाळी १० मिनिटे मेडिटेशन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

KDMC : केडीएमसीचा गलथान कारभार! झोपडपट्टीला २.३३ लाखांची नोटीस; विधवा महिलेचं घर जप्त करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT