Ravi Rana Yashomati Thakur
Ravi Rana Yashomati Thakur Saam tv
महाराष्ट्र

Amaravati: रुग्णालयात लागलेली आग म्हणजे कोरोना काळातील पाप; आमदार राणा यांची यशोमती ठाकुर यांच्‍यावर टीका

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग म्हणून कोरोना काळातील पाप आहे. सात कोटीचा प्रस्ताव मंजूर करायला महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) वेळ नव्हता. तत्कालीन पालकमंत्रीला जाग आली नाही; अशी टीका करत आता सहा महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णांची इमारत उभी होईल; असे आश्वासन रवी राणा (Ravi Rana) यांनी दिले. (Amaravati Today News)

अमरावती (Amaravati) जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी आग आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तर आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवणीत कौर यांच्‍या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत (BJP) भाजप खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे उपस्थित होते. याठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढे आग लागणार नाही; यासाठी काळजी घेतली जाईल. आज चौकशी अहवाल हाती येईल अशी माहिती जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिली

पटोले, ठाकूर यांनी मगरीचे अश्रू गाळले

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली. काल नाना पटोले व यशोमती ठाकूर यांनी मध्ये ठाकूर मगरीचे अश्रू गाळले, तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा सात कोटीचा प्रस्ताव मंजूर केला नाही. या प्रस्तावावरील धूळ देखील त्यांनी साफ केली नाही. म्हणून हे सगळे त्यांनी मगरीचे अश्रू गाळले; अशी खरमरी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

SCROLL FOR NEXT