Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: विद्युत अभियंतासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

विद्युत अभियंतासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना कृषीपंपाची बारा तास वीज देण्यात येत आहे. मात्र पश्चिम विदर्भाला यात वगळण्यात आले. शेतकऱ्यांच्‍या (Farmer) प्रश्‍नावर उद्धव ठाकरे गटाच्‍या शिवसेनेतर्फे (Shiv Sena) वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्‍य अभियंत्‍याच्‍या कक्षातच पंख्‍याला दोरी बांधून एकाने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. (Live Marathi News)

अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 40 कृषीपंपाच्या (डीपी) रोहित्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच सिंचन करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. शेतात सिंचन होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे आज उद्धव ठाकरे गटाच्या ठाकरे गटातर्फे अमरावतीच्या मुख्य वीज वितरण (MSEDCL) अभियंताच्या कक्षात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना विभागीय संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

कार्यालयात उडाली खळबळ

युवासेना पदाधिकारी प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत चक्क अभियंत्याच्या समोरच पंख्यावर दोर गळ्यात टाकून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक आत्महत्येचा प्रयत्न प्रकाश मारोटकर यांनी केल्याने या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान बंद असलेल्या सर्व डीपी तातडीने दुरुस्त करण्यात येईल; असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

SCROLL FOR NEXT