Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाची धाड, व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी; सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचा पथकात समावेश?

Marathi News: अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी कालपासून धाडी टाकल्या आहेत.

अॅड. जयेश गावंडे

Akola News Today: अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी कालपासून धाडी टाकल्या आहेत. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे. दरम्यान, पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा (Abdul Sattar) स्विय सहायक दिपक गवळी आणि वादग्रस्त असलेल्या हितेश भट्टड यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) यावरून अब्दूल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अकोल्यातील कृषीमंत्र्यांच्या कथित पथकाविरोधात खंडणीची तक्रार करणाऱ्या अक्षत फर्टीलायझर्स विरोधात कृषी विभागानं कारवाई सुरू केली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील कंपनीच्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. या कंपनीचा माल असलेल्या गोदामाला सील लावल्याची माहिती मिळत आहे.

बियाण्यांसह खतांचे परीक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत मिळावेत, यासाठी कृषि विभागाच्यावतीने प्रत्येक वर्षी बियाणे, खत तपासण्याची मोहिम राबविण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामातही कृषी विभागाच्या पथकाकडून कृषी केंद्र, गाेदामााची पाहणीस प्रारंभ झाला. राज्यस्तरीय पथकाने एमआयडीसी परिसरातील गाेदामांची तपासणी माेहिम सुरू केली. (Political News)

मात्र पथकातील तपासणीवरून वाद निर्माण झाला. पथकातील खासगी व्यक्तिकडून थेट गाेदामात जात साहित्याची नासधूस केल्याचा आरोप व्यावसाियक व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांनी थेट कृषी कार्यालयात धाव घेतली. त्यांनी अधिकारी यांना निवेदन दिले. दरम्यान यासंदर्भात आमदार मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: मिरा भाईंदरमध्ये भाजपचीच सत्ता येणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज?

Municipal Elections Voting Live updates: नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा

​​Nashik Ring Road: विकासाकडे नेणारा रिंगरोड; नाशिक ते तिरुपतीचा १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार १२ तासात

Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT