पुर्णा धरणाचे सर्वच दरवाजे उघडले; धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा अरुण जोशी
महाराष्ट्र

पुर्णा धरणाचे सर्वच दरवाजे उघडले; धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुर्णा धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने वाढ होत असल्याने धरणातील पाण्याची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे सर्वच्या सर्व ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

अरुण जोशी

मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या पाऊसामुळे कोकणासह मुंबईची(Mumbai kokan) दाणादाण उठवली आहे मात्र आता कोकण मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातच पावसाचा कहर सूरु आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह अमरावती नागपुरला पण पाऊस पडत आहे.अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी स्थित पुर्णा धरणाच्या (Purnadam) पाणीसाठ्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने वाढ होत असल्याने धरणातील पाण्याची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे सर्वच्या सर्व ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. All the gates of the Purna Dam opened; Warning to the villages near the dam

याच पार्श्वभूमीवर धरणालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा(Be alert Warning) इशारा देण्यात आला आहे. तसेच पुर्णा नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.तसेच कोणत्याही क्षणी पुर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची(All Gates Open) पुर्वकल्पना प्रकल्प व्यवस्थापनाकडून महसुल विभागाला यापुर्वीच देण्यात आली असल्याच धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.

तसेच अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी पुर्णा नदी काढच्या सर्व गावांना सतर्कतेचा आधीच इशारा दिला होता असही सांगण्यात येत आहे.गेल्या चार दिवसापासून उगमस्थळावर व विश्रोळीस्थित धरणस्थळावर सततधार पाऊस सुरु असल्याने तसेच उगमस्थळावरील भदजई येथे २४ तासात झालेल्या १९३ मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या पाऊसामुळे धरणातील पाणीपातळी वाढल्यामुळे धरणाचे सर्व नऊ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले असून त्यातून दर सेकंदाला १२३ घ.मी.(TMC) पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहीती पुर्णा प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता(Senior Engineer) अक्षय ईरजकर यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, नेटकऱ्यांनी जोरदार फटकारले; VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT