Explore Alibaug Easily Saam
महाराष्ट्र

गोव्याची खास सर्व्हिस आता अलिबागमध्ये लवकरच; पर्यटक खुश, नेमकी कोणती सेवा सुरू होणार?

Explore Alibaug Easily: गोव्यासारखी सर्व्हिस आता पर्यटकांना अलिबागमध्येही घेता येणार आहे. पर्यटकांना परवानाधारक ऑपरेटरकडून तासभर किंवा दिवसासाठी बाईक किंवा स्कूटर भाड्यानं मिळणार.

Bhagyashree Kamble

  • अलिबागमध्ये बाईक रेंटल सेवा सुरू.

  • पर्यटकांना सुरक्षित - कायदेशीर बाईक, स्कूटर भाड्यानं मिळणार.

  • रोजगाराला मोठा फायदा.

गोव्यात फिरण्यासाठी बहुतांश लोक बाईक किंवा स्कूटीचा वापर करतात. हा अनुभव अनेक पर्यटकांसाठी खास ठरतो. दरम्यान, हाच अनुभव आता पर्यटकांना अलिबागमध्येही घेता येणार आहे. अलिबागमध्ये बाईकमध्ये फिरता येणार आहे. अलिबागमध्ये बाईकवर फिरणे अधिक सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक रेंटल सेवेला अधिकृत परवाना दिला आहे. यामुळे पर्यटक आता बाईक किंवा स्कूटी भाड्यानं घेऊन अलिबाग फिरू शकतील.

परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात राज्य परिवहन प्राधिकरणाने रेंट ए मोटारसायकल स्कीम १९९७ अंतर्गत २ ऑपरेटर कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. हा परवाना ५ वर्षांसाठी वैध असून, त्याचे वार्षिक शुल्क १००० रूपये आहे.

या योजनेनुसार, पर्यटक आणि स्थानिक आता तासभर किंवा दिवसासाठी बाईक आणि स्कूटर भाड्यानं घेऊ शकतात. परवानाधारक ऑपरेटर सरकारचे सर्व नियम आणि सुरक्षा मानके पूर्ण करत असल्याची खात्री केली जाणार आहे.

पर्यटन आणि रोजगाराला चालना

या निर्णयामुळे अलिबागच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यासह स्थानिकांसाठीही उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोतही निर्माण होईल. यापूर्वी काही हॉटेल्स किंवा व्यक्तींकडून बेकायदेशीर बाईक भाड्यानं देण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता पर्यटक परवानाधारक ऑपरेटरकडून अधिकृतपणे बाईक किंवा स्कूटी भाड्यानं घेऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने हिवरा नदीत घेतली उडी,पाचोऱ्यामधील धक्कादायक घटना

नाशिकच्या हायप्रोफाइल सोसायटीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकली, आतलं दृश्य बघून सगळेच हादरले

Shocking : नदीवर पोहोयला गेले अन् विपरित घडलं; ४ मित्रांची ठरली शेवटची आंघोळ

Rupali Bhosle: पांढरी साडी अन् लाल लिपस्टिक, रूपाली भोसलेच नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट

Accident News : किराणा आणायला गेली पुन्हा घरी परतलीच नाही..., ट्र्कच्या धडकेत महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT