Shivshahi Bus Accident Saam Digital
महाराष्ट्र

Shivshahi Bus Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस 'वे'वर शिवशाही बसला अपघात, अलिबागहून स्वारगेटला जात होती बस

Shivshahi Bus Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसचा अपघात झाला असून बस रस्त्यात अडकल्यामुळे तीनही लेन बंद झाल्या होत्या. खोपोली हद्दीतील बोर घाटात हा अपघात झाला.

Sandeep Gawade

Shivshahi Bus Accident

मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसचा अपघात झाला असून बस रस्त्यात अडकल्यामुळे तीनही लेन बंद झाल्या होत्या. खोपोली हद्दीतील बोर घाटात हा अपघात झाला. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. बस अलिबागहून स्वारगेट जात होती. तब्बल तासभर वाहतूक वाहतूक ठप्प झाली होती. बस बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

सारंगखेडा ते शहादा रस्त्यावर अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरील सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेले वाहन व मोटरसायकलीचा भीषण अपघात झालाय. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दोन्ही युवक सारंगखेडा येथे मासेमारी करण्यासाठी येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक जोरदार बसल्याने यात दोन्ही युवक रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.

धावत्या दुचाकीवरून हवेत लांबवर ते फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले.

यावेळी सारंगखेडा येथील सरपंच शेताकडे जात असताना त्यांनी रस्त्यावरील अपघात झाले आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला. या घटनेत कापसाने भरलेली गाडी देखील पलटी झाली. वाहन चालकाला सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप या घटनेत मृतांची ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT