Alibaug Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: लाल इश्क! गर्लफ्रेंडला मंदिराबाहेर बोलावलं, आधी हातोड्याने ३ तास मारलं; मग दगडाने ठेचलं, अलिबाग हादरले

Alibaug Crime: अलिबागमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हातोड्याने तब्बल ३ तास तो गर्लफ्रेंडला मारत होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

रायगडमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडच्या डोक्यामध्ये हातोडा मारत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या अलिबागमध्ये ही घटना घडली. गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयावरून या तरुणाने तिच्यावर हल्ला केला. मंदिराबाहेर तब्बल ३ तास हा तरुण गर्लफ्रेंडचा छळ करत होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार करतच राहिला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडचं दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. अलिबागच्या कनकेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सूरज बुरांडे (२८ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण अलिबागच्या वरसोलपाडा थेरॉड बाजारपेठमध्ये राहतो. शुक्रवारी हे दोघेजण एकमेकांना भेटले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर सूरजने हातोड्याने गर्लफ्रेंडवर अनेकदा वार केले. तब्बल ३ तास तो तिच्यावर वार करत होता.

गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयावरून रागाच्या भरात सूरजने हे धक्कादायक कृत्य केले. दोघेही मंदिर परिसरात एका झाडाच्या खाली गप्पा मारत बसले होते. सूरजने तू फोनवर कुणासोबत बोलते. त्या तरुणाबद्दल त्याने गर्लफ्रेंडला जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सूरजने बॅगेत आणलेला हातोडा बाहेर काढून गर्लफ्रेंडच्या डोक्यावर आणि कपाळावर मारू लागला.

ऐवढ्यावर न थांबता तो गर्लफ्रेंडला खेचत घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. त्याठिकाणी त्याने दगडाने तिला मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली. जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT