Alibag district hospital slab collapse patient injured saam tv
महाराष्ट्र

Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

Government Hospital Ceiling Slab Falls on Patient: अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळला. या घटनेनंतर रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतलीय.

Bharat Jadhav

  • अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळला.

  • या दुर्घटनेत सुनील आवरे जखमी झाल्याची माहिती आहे.

  • रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला.

सचिन कदम,साम प्रतिनिधी

काही दिवसापूर्वीच अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रायगडच्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळलाय.

सुनिल आवरे असं जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. सुनिल आवरे हे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचवेळी रुग्णालयाच्या खोलीचा स्लॅब रुग्णाच्या अंगावर कोसळला. दरम्यान रुग्णालयाची दुरावस्था आणि स्लॅब कोसळण्याची दुर्घटनेवरून शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्र लेखा पाटील त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी रुग्णालयाची दयनीय स्थिती पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली.

जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन शेकापच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या दुरवस्थेवर जाब विचारला. लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून काहीजण गौतमी पाटीलला नाचवण्यात धन्यता मानतात. असा टोलाही चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांना यावेळी लगावला आहे.

बेडरूमचा स्लॅब कोसळून ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू,नवी मुंबईतील घटना

एका महिन्यापूर्वी नवी मुंबईतील कोमोठे येथे इमारतीच्या एका प्लॅटचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. यात एका ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कामोठे सेक्टर १० मधील साई सिद्धी सोसायटीत ही दुर्घटना घडली होती.घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळला होता. यात सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची १२ वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली होती.

अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बलाद येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली होतीय. या दुर्दैवी घटनेत १३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने, सर्व जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले. बबलाद येथील जिल्हा परिषदेची शाळा जवळपास २५ वर्षे जुनी आहे. दुपारच्या वेळी विद्यार्थी वरांड्यामध्ये खेळत होते. त्याचवेळी इमारतीच्या जुन्या झालेल्या स्लॅबचा भाग अचानक खाली पडला. स्लॅबचा हा थर थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळल्याने तब्बल १३ मुले जखमी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात मालवाहू छोट्या टेम्पोला आग

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

E Challan : आता रस्त्यांवर लोकल पोलिसही कापणार ई-चलान; ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर वाढणार कारवाई

SCROLL FOR NEXT