crime news SaamTv
महाराष्ट्र

अलिबागमध्ये भरदिवसा चोरट्यांनी फोडले तीन फ्लॅट; लाखोंचा ऐवज लंपास!

गजबजलेली बाजारपेठ, नागरिकांची खरेदी साठी वर्दळ, त्यात मध्यान्हची साडे अकरा ते साडे बाराची वेळ अशी परिस्थिती असताना चोरट्यांनी बंद असलेल्या दोन सोसायटीतील तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून लाखोंची रक्कम लंपास केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : गजबजलेली बाजारपेठ, नागरिकांची खरेदी साठी वर्दळ, त्यात मध्यान्हची साडे अकरा ते साडे बाराची वेळ अशी परिस्थिती असताना चोरट्यांनी बंद असलेल्या दोन सोसायटीतील तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून लाखोंची रक्कम लंपास केली आहे. ही घटना घडली आहे आज दुपारी अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात. त्यामुळे अलिबाग पोलिसांसमोर या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे. अलिबाग शहरात झालेल्या या घरफोडी ह्या महितीमधील चोरट्यांनी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा :

अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठेत ओजोन सोसायटीतील अमित ललित जैन तर गंभीर सोसायटीमधील अरुण अरविंद गंभीर आणि रुपेश कांतीलाल जैन याच्या बंद असलेल्या फ्लॅटचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दुपारच्या सुमारास घरफोडी करून लाखोंचा माल लंपास केला आहे. दोन्ही सोसायटी ह्या बाजारपेठेत असल्याने नेहमी वर्दळ असते. गंभीर सोसायटीतील रुपेश जैन आणि त्याची पत्नी बाहेर गेली होती. तर त्याची आई ही सकाळी साडे अकरा वाजता बाजारहाट करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तर याच सोसायटीतील अरुण गंभीर याचे कुटूंब आणि ओजोन सोसायटीतील अमित जैन याचे कुटूंब मुंबईत राहत असल्याने फ्लॅट बंद होते. तिन्ही फ्लॅटमध्ये कोणीच नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. रुपेश जैन याचे कुटूंब घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

जैन यांनी अलिबाग पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून रुपेश जैन याच्या कपाटातील साडे तीन लाख रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. तर इतर दोन फ्लॅटधारक हे मुंबईत असल्याने त्याचे किती नुकसान झाले याबाबत अजुन माहिती कळलेली नाही. रुपेश जैन यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. अलिबाग पोलीस या घरफोडीबाबत पुढील तपास करीत असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे ठाकले आहे. मात्र, महिन्याभरापासून अलिबाग तालुक्यात चोरी, घरफोडी सत्र वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT