Accidental Death Of Akshay Mane विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : बंद पडलेल्या इमारतीत दारू पार्टी; तिसऱ्या मजल्यावरुन पडून एकजण जागीच ठार

Sangli News : सुरक्षारक्षकाने आणि त्याच्या मित्रांने या बंद पडलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी केली होती, ते सगळे दारुच्या नशेत होते.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: दारुची पार्टी (Drunk) करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मिरज (Miraj) तालुक्याच्या गुंडेवाडीतील तरुण जागीच ठार झाला आहे. बंद पडलेल्या डी एम के टोयोटा इमारतीवर ही घटना घडली आहे. अक्षय कुमार माने वय 21 राहणार कैकडे गल्ली गुंडेवाडी असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Sangli Drunk Man Falls From Building)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास तांनग फाटा येथे बंद पडलेल्या डी एम के टोयोटा शोरुमच्या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षकाने आणि त्याच्या मित्रांने या बंद पडलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी केली होती. सुरक्षारक्षकसोबत अक्षय माने आणि गुंडेवाडी येथील आणखी दोघे मित्र असे चौघे या पार्टीचा आस्वाद घेत होते. दारुच्या नशेत खाली उतरताना अक्षय हा तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर सनी माने याने मयत अवस्थेत अक्षय माने याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT