Ganpatipule Shree Ganesh Idol saam tv
महाराष्ट्र

Akshaya Tritiya: दगडूशेठ हलवाई, गणपतीपुळे, पंचमुखी गणेशास आंब्यांची आरास (व्हिडिओ पाहा)

हजाराे भाविक आज गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- ज्ञानेश्वर हिंगोलीकर / अमोल कलये

पुणे/रत्नागिरी : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर (akshaya tritiya 2022) पुण्यातील (pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (shrimant dagdusheth halwai ganpati) मंदिरासह राज्यातील विविध गणेश मंदिरात आज बाप्पां समोर आंब्यांची आरास करण्यात आली आहे. दगडूशेठसह रत्नागिरीतील (ratnagiri) गणपतीपुळे मंदिरात, साता-यातील (satara) श्री पंचमुखी गणेश मंदिरात आंब्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांची सकाळ पासूनच गर्दी झाली आहे. (akshaya tritiya latest marathi news)

११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आज अक्षय तृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीया निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे उद्या (बुधवार) ससून येथील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम , दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांनी सकाळ पासूनच मंदिरात गर्दी केली आहे.

गणपतीपुळे मंदिरात सजावटीतून बाप्पांना हापूस आंब्यांचा नैवेद्य

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा प्रमाणेच रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात देखील गणपती बाप्पा समोर आंब्यांची आरास करण्यात आली आहे. पुजारी अमित घनवटकर आणि सिद्धेश वैद्य यांनी बाप्पांच्या मुर्ती समाेर हापूस आंब्याची आरास केली आहे. गणपतीच्या गर्भगृहात ही हापूस आंब्याची आरास केली आहे. सलग तिस-या वर्षी ही आरास करण्यात आली आहे. हे आंबे प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येणार असल्याची माहिती मंदिरातून देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT