road closed 
महाराष्ट्र

पूलाचा भाग खचला; शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस बंद

जयेश गावंडे

अकाेला : बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव - अकोट राज्य मार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे. गत दोन दिवसांपासून परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यामुळे मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचला. या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. akot-shegoan-highway-road-to-remain-closed-buldhana-akola-rain-update-news-sml80

या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. शेगाव - अकोट राज्य मार्गावरील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरीळ मन नदीवर इंग्रज कालीन पूल बांधलेले आहे. हe पूल नादुरुस्त असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम संथ गतीने सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.

२२ जुन रोजी नादुरुस्त पुलाचा काही भाग खचल्याने यावरून जाणारे वाहन पुलावरून खाली अर्धे लटकले होते. यामुळे येथून वाहतुक बंद करण्यात आली होती. तात्पूत्या दुरुस्ती नंतर आठ दिवसांनी या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली होती. मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचला. यामुळे या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे याची नाेंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT