अपघात साम टीव्ही
महाराष्ट्र

अकोट महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

अकोला, गत काही वर्षांपासून अकोला ते अकोट या महमार्गाचे काम रखडलेले आहे. खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अनेकांचे जीव गेले असून आजही एका युवकाचा अपघातात बळी गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला, गत काही वर्षांपासून अकोला ते अकोट या महमार्गाचे काम रखडलेले आहे. खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अनेकांचे जीव गेले असून आजही एका युवकाचा अपघातात बळी गेला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना अकोला-अकोट मार्गावरील बळेगाव फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भयानक होता की, अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटली नसून या प्रकरणाची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठले आणि पुढील तपास सुरू केला आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत काही वर्षांपासून अकोला अकोट या महामार्गाचे काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने या महामार्गाचे काम सुरू असून मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर चिखलामुळे वाहनांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. तर या महामार्गावर आतापर्यंत अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. मात्र तरीही कुणाला याचे देणेघेणे नाही. त्यामूळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT