Akola Shivsena Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेना आपला गड राखणार? जिल्हा परिषद हातरुण पोटनिवडणुकीचा आज निकाल

बाळापूर येथील तहसील कार्यालयात ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) हातरुण सर्कलसाठी काल 55.76 टक्के मतदान झाले. दरम्यान मतदानाची (Election) प्रक्रिया पूर्ण झाल्याने आज मतमोजणी करण्यात येणार आहे. बाळापूर येथील तहसील कार्यालयात ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भाग्याच्या फैसल्यासाठी अवघ्या काही तासाचा अवधी उरला आहे. (Akola Latest Marathi News)

जिल्हा परिषदेच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण सर्कलमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) सदस्या सुनीता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या सर्कलसाठी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली. तर एक अपक्षही उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या मैदानात होता.

या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो त्यावर जिल्हा परिषद मधील सत्ता समीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची मानली जात आहे. या सर्कलमध्ये 55. 76 टक्के मतदान झाले आहे.

हातरुणचा गड शिवसेना राखणार का?

हातरुण सर्कल मध्ये शिवसेनेच्या सुनीता गोरे ह्या निवडुन आल्या होत्या मात्र त्यांना अपात्र घोषित केल्याने येथे पोटनिवडणुक पार पडली. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली आहे. दरम्यान शिवसेना हा गड राखणार की नाही. हे आजच्या निकालावर स्पष्ट होणार आहे. दरम्यान ही निवडणूक सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या साठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT