Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News : "माझं लग्न होत नाही कृपया... " लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र, वाचा नेमकं काय म्हणाला....

Akola Sharad Pawar News : अकोल्यातील एका तरुणाने लग्न जुळत नसल्याने थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या,” अशी भावनिक विनंती त्याने केली आहे.

Alisha Khedekar

अकोल्यात तरुणाने शरद पवारांना लग्न होत नसल्याने पत्रातून साकडं घातलं

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये लग्न न होण्याचं प्रमाण वाढलं

सोलापूरमध्ये यापूर्वी लग्नाळू तरुणांनी काढलेला मोर्चा

सामाजिक व आर्थिक अडचणींमुळे लग्न होत नसल्याचे कारण समोर

राज्यातील अनेक ग्रामीण भागातील वयात आलेल्या मुलांना कोणी मुली देत नसल्याचं समोर आलं आहे. त्यांचं वय निघून गेलं तरी लग्न काही ठरेना. ही गंभीर सामाजिक समस्या बहुतेकांना चांगलीच माहीत आहे. मात्र या समस्येवर तोडगा म्हणून हताश झालेल्या तरुणांनी आता थेट देशपातळीवरील नेत्यांना साकडे घातले आहे. अकोल्यातील एका तरुणाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लग्न जुळत नसल्याने थेट पत्र लिहत विनंती केली की, "माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही!"

अकोल्यात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक जण बोलले. काहींनी निवेदने दिली. त्यापैकी एक निवेदनवजा पत्र पाहून शरद पवार व त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले. हे पत्र त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखविले. या तीन नेत्यांमध्ये पत्रावरून चर्चा झाली.

या पत्रात तरुणाने लिहिले होते की, ‘माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो. मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही. "

या पात्रातील मागणी नंतर सोलापूरमध्ये ३ - ४ वर्षांपूर्वी झालेल्या नवरदेव मोर्चाची आठवण समोर आली. डिसेंबर २०२२ मध्ये सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले २५ पेक्षा अधिक नवरदेव नवरी मिळावी अशी मागणी करीत निघाले होते. लग्नासाठी योग्य मुलींची स्थळे येत नसल्याने हे आंदोलन झाले होते.

सामाजिक विषमता ग्रामीण भागातील समाजकारण, अर्थकारण पूर्णपणे बदलल्यामुळे शिक्षण, नोकरी, छोकरी, सुखी संसार ही तीन-चार दशकांपूर्वीचा तरुणांचा जीवनक्रम आता पूर्ण बदलला आहे. मुलामुलींचे लिंग गुणोत्तर बदलले. मुलींची संख्या कमी झाली. जोडीदाराकडून मुलींच्या अपेक्षाही वाढल्या. शहरी व नोकरदार मुलगा हवासा वाटू लागला. परिणामी, नोकरी नसलेले तरुण बिनलग्नाचे राहू लागले. विवाहसंस्था अडचणीत आली. नवी सामाजिक विषमता रूजू लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT