Akola mobile blast Video Saam tv
महाराष्ट्र

Akola mobile blast Video : भयंकर! खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट; थोडक्यात जीव वाचला, तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : तरुण, महिला असो वृद्ध... मोबाईल अनेकांसाठी जीव की प्राण झाला आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात मोबाईल पाहूनच होते. काही लोक मोबाईलशिवाय तासभर देखील राहू शकत नाही. याच मोबाईलबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यात तरुणाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. या संपूर्ण घटनेत तरुण थोडक्यात बचावला. हा संपूर्ण प्रकार अकोटमधील नगरपालिकेसमोर घडला आहे.

अकोल्यातील अकोट शहरातील शंकर बुंदले नावाच्या तरुणाने नेहमी प्रमाणे मोबाईल फोन खिशात ठेवला होता. काही वेळाने मोबाईल खिशात ठेवलेल्या खिशातून अचानक धूर येऊ लागला. या धूराकडे नजर जाताच शंकरने मोबाईल खिशातून बाहेर काढला. त्यानंतर मोबाईल रस्त्यावर फेकला. रस्त्यावर फेकलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. शंकरने मोबाईल रस्त्यावर फेकल्याने तो थोडक्यात बचावला. या मोबाईलमुळे शंकरच्या पँटचा खिसा पूर्णपण जळून गेला.

शंकरकडे महागडा मोबाईल होता. मोबाईल गरम झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. अकोट शहरातील नगरपालिकेसमोर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या घटनेने अकोटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शंकर बुंदले काय म्हणाला?

मोबाईलचा स्फोट झालेल्या शंकर बुंदले यांनी सांगितले की,'मी घराबाहेर निघालो होतो. मोबाईल माझ्या खिशात होता. मोबाईल खूप झाला होता. या मोबाईलमधून अचानक धूर येऊ लागला. यामुळे मोबाईल रस्त्यावर फेकला. त्यानंतर तातडीने रस्त्यावर फेकलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. या धावपळीत पडलो'. दरम्यान, या तरुणाने मोबाईल कंपनीवर संतापही व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT