Liver transplant saam tv
महाराष्ट्र

Liver transplant: बायको असावी तर अशी! लिव्हरचा भाग देऊन वाचवले पतीचे जीव

Living liver donor: अकोल्यातील वर्षा इंगळे यांनी पती प्रशांत इंगळे यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे यशस्वी यकृत प्रत्यारोपण होऊन प्रशांत यांना नवजीवन मिळालं.

Surabhi Jayashree Jagdish

लग्नाच्या वेळी अग्नीला साक्षी ठेवून "सात जन्म साथ देईन" असं वचन प्रत्येक जोडपी एकमेकांना देतात. पण अकोल्यातील वर्षा इंगळे यांनी हे वचन केवळ शब्दांपुरत न ठेवता स्वतःच्या कृतीतून ते जगाला खरं करून दाखवलंय. पती प्रशांत इंगळे यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या लिव्हरचा काही भाग दान केला. दुसरीकडे लाखो रुपयांचा उपचार खर्च परवडणं शक्य नसताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीमुळे हे यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणं पार पडलं. पत्नीच्या या दानावुळे प्रशांत इंगळे यांना नवजीवन मिळालं.

अकोल्यातील ४७ वर्षीय प्रशांत इंगळे हे केबल टाकण्याचं काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी वर्षा, कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. साध्या कुटुंबातील प्रशांत यांच्या आयुष्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये अचानक संकट आलं. त्यांना सतत पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूरमध्ये तपासण्या केल्यानंतर त्यांचं यकृत निकामी होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावर एकच उपाय होता. तो उपाय म्हणजे यकृत प्रत्यारोपण.

उपचारांचा खर्च परवडण्याजोगा नव्हता

मात्र या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. रोजंदारीवर कुटुंब चालवणाऱ्या इंगळे कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणं अशक्य होतं. अशा वेळी पत्नी वर्षा इंगळे यांनी हार मानली नाही. त्यांनी केवळ पतीच्या उपचारासाठी धावपळ केली नाही तर स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचाही मोठा निर्णय घेतला.

या कठीण काळात वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. आमदारांनी त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली.

रामेश्वर नाईक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसंच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. अशा प्रकारे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि अत्यंत यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.

जून महिन्यात करण्यात आली शस्त्रक्रिया

२५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. या शस्त्रक्रियेत पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिलं. शस्त्रक्रियेनंतर प्रशांत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला पायात सोन्याचे पैंजण का घालत नाही?

Maharashtra News Live Update: उल्हासनगरच्या आशालोक इमारतीत भीषण आग; १० हून अधिक वाहने जळून खाक

High Court: ट्रेनमध्ये महिलेवरील सामूहिक बलात्काराला रेल्वे जबाबदार, पीडितेला ३ लाख रुपये देण्याचे हायकोर्टाचे आदेश

Night Mopping : रात्री घरात लादी पुसणं योग्य की अयोग्य? स्वच्छता तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा...

सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राजकारण तापले; NCP कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले, VIDEO

SCROLL FOR NEXT