akola road accident  saam tv
महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यातील महामार्गावर अपघात; वाढदिवसाला जात असताना महिलेवर काळाचा घाला

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने मोटर सायकलला जोरदार भीषण धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने मोटर सायकलला जोरदार भीषण धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील दाळंबीजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला उडवले. यात एक महिला ठार झाली असून, दोन व्यक्ती जखमी झाले आहेत, यात एक लहान मुलीचाही समावेश आहे. (Akola road accident News )

खर्डा गावातील रहिवासी नाजूकराव गवई यांची पत्नी वर्षा व मुलगी काजल नातेवाईकांच्या घरी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वाहनाने जात होते. या दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील दाळंबीजवळ त्यांच्या मोटर सायकलला मालवाहू वाहनाने उडवले. या अपघातात वर्षा नाजुक गवई (वय ३५ वर्ष) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

तर मुलगी काजल गंभीर जखमी झाली. गंभीर असल्याने तिला अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटर सायकल चालक नाजूक गवई यांना सुध्दा मार लागला आहे. यावेळी कुरणखेड येथील सदैव मदतीसाठी धावून येणारे वंदेमातरम आपात्कालीन पथकाचे मनिष मेश्राम, नितेश मोहोड, उमेश आटोटे, गौतम मोहोडसह उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारार्थ रवाना केलेत.

पाठलाग करून ट्रक चालकाला पकडलं

ट्रक चालक हा अपघातानंतर फरार झाला होता. मात्र, काही अंतरावर सोनोरी गावाजवळ नागरिकांनी आयशर वाहनाचा पाठलाग करून त्याला पकडले. अपघातामुळे बराच वेळ राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघात स्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spotted Owl Facts: रात्री पिंगळा पक्षी का ओरडतो? काय असतात संकेत? जाणून घ्या सत्य

Boby Detox Drink: शरिराला डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी प्या 'हे' स्पेशल ड्रिंक, ब्लोटिंग आणि पचन सुधारते

Mumbai Local : '...काट डालुंगा' MSF जवानाला मारहाण अन् धमकी; मुंबई लोकलमध्ये राडा, Video

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला!

How To Store Dry Coconut: सुकं खोबरं साठवून ठेवण्यासाठी सोप्या 5 ट्रिक , महिनाभर राहिल फ्रेश

SCROLL FOR NEXT