AKOLA TENSION ESCALATES: STONE PELTING, VANDALISM AND PROTEST AT POLICE STATION AFTER CLASH BETWEEN TWO GROUPS 
महाराष्ट्र

Akola Violence: अकोल्यात दोन गटात तणाव, दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; शेकडो जणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Akola Violence: अकोल्यातील बाभुळगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. या वादानंतर दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्यात आली. धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

Bharat Jadhav

  • अकोल्यातील बाभुळगाव येथे दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

  • दोन्ही गटांकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.

  • एका गटाकडून धार्मिक स्थळावर हल्ला केल्याची माहिती समोर आली.

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यामधील बाभुळगावमध्ये दोन गटात वाद झाला असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी काल रात्री दोन गटात किरकोळ कारणानंतर वाद झाला त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक आणि वाहनाची तोडफोड केली. एका गटाकडून धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात यावी म्हणून काहींनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

धक्का लागल्यानं झाली दगडफेक

हाती आलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा धक्का लागल्याने या दोन गटातील काही तरुणांमध्ये झाला वाद झाला. यात दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जवळपास ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांना सात ते आठ जणांनी मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर बाभूळगाव परिसरात तणाव निर्माण झाला.

वाद होत असताना काहींनी परिसरातील वाहनाची तोडफोड केली. घटनास्थळी अकोला पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. मात्र घटनेनंतर धार्मिक स्थळावर दगडफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी एका गटातील शेकडो लोकांनी MIDC पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तब्बल तासभर पोलीस ठाण्यात त्यांनी ठिय्या मांडला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून सर्वांना शांततेच आवाहन केलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Hidden Waterfalls: कोंडेश्वर ते नाणेघाट... बदलापूरजवळचे ८ अप्रतिम धबधबे; गर्दीपासून दूर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या

Weight Loss Ice Cream Recipe : आईस्क्रीम खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' सीक्रेट रेसिपी

Mumbai Pune train : लोणावळ्याजवळ दरड कोसळली, ३१ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल, १७ ट्रेन रद्द, वाचा संपूर्ण यादी

Pune Schools Holiday: मोठी बातमी! पुण्यातील १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी, पुढच्या सोमवारी भरणार शाळा, नेमकं कारण काय?

Monsoon Waterfall: पावसाळ्यात फिरायला जायचयं? मग पुण्याजवळील 'या' निसर्गरम्य धबधब्यावर करा विकेंड प्लॅन

SCROLL FOR NEXT