Akola Two children Drown In Drain Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: गावाशेजारील नाल्याच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Akola Two children Drown In Drain: सध्या बागायती पिकांना कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडलं जात आहे. काही शेतकऱ्यांनी या कालव्याच्या पाण्याचे पाट या नाल्यात सोडून दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोल्यात नाल्याच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. खेळ असताना नाल्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. जिल्ह्यातील दापुरा-मजलापूर येथे ही घटना घडलीय. दापुरा येथील कोला नाल्याच्या पात्रातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला. समर इंगळे आणि दिव्यांशू डोंगरे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

दापुरा येथील समर योगेश इंगळे आणि दिव्यांशु राहुल डोंगरे हे इतर दोन मुलांसह खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी ते गावाशेजारील नाल्याकडे खेळण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना नाल्यात पोहण्याचा मोह झाला. गावाशेजारच्या कोलार नाल्याच्या पात्रात चारही चिमुकले पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी समर आणि दिव्यांशु या दोन्ही चिमुकल्याचा कोलार नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हा प्रकार नाल्याच्या काठावर उपस्थित अन्य दोघा चिमुकल्यानी गावात येऊन सांगितला. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. या दोन्ही चिमुकल्यांचा कोलार नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सध्या बागायती पिकांना कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडलं जात आहे. काही शेतकऱ्यांनी या कालव्याच्या पाण्याचे पाट या नाल्यात सोडून दिले.

तसेच इतर शेतकऱ्यांनी या नाल्याचे जेसीबीने नुकतेच खोलीकरण केले. त्यामुळे या साचलेल्या पाण्यात हे चारही मित्र आंघोळीसाठी उतरले होते. परंतु त्यापैकी यातील दोन्ही मुले बुडाली, अशी चर्चा दापोरा गाव पसरलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

Maharashtra Politics: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी आणखी एका मंत्र्याचे अधिकार काढून घेतले, राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

SCROLL FOR NEXT