Akola Accident News  Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Akola Accident News : अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात झाला. ट्रेनमधून उतरताना प्रवासी गाडी खाली गेला.

Vishal Gangurde

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनखाली अडकला

जय गजानन पथकाने गॅस कटर वापरून प्रवाशाची केली सुटका

अपघातात प्रवाशाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झा

घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola Accident : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला हादरवणारी धक्कादायक घटना आज अकोला जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर ही घटना घडलीय. रेल्वेतून उतरताना प्रवासी हा फलाट आणि ट्रेनच्या फटीत अडकला. या भीषण अपघातून प्रवासी बचावला.

पुणे–अमरावती या गाडीतून मूर्तिजापूरला अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अकोल्यातील मुस्ताक खान मोईन खान यांचा विचित्र अपघात झाला. हा प्रवासी दुपारी पावणे चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरतानाच घसरला आणि थेट गाडीच्या खाली अडकला. जखमी प्रवासी एवढा घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्यप्राय ठरत होते.

तत्काळ रेल्वे पोलिसांनी जय गजानन आपत्कालीन पथकाला पाचारण केले. पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे पायदान कापून अडकलेल्या मुस्ताक खानची सुटका केली. या दरम्यान प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे–अमरावती गाडी तब्बल एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली होती. गाडी थांबून राहिल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या अपघाताने रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे केले असून स्थानिक प्रवाशांतून मोठी चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : सोन्याचा भाव 1,21000 रुपयांवर पोहोचला, काय आहे तेजीचं कारण? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : आनंदाची शिधा योजना बंद करू नका, महिलांची सरकारकडे मागणी

ठाकरी बाणा, धारधार विधानं! प्रबोधनकार ठाकरेंच्या "त्या" पुस्तकात नेमकं आहे तरी काय? VIDEO

मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार अन् शिवसेनेला धक्का, भाजपची ताकद वाढली

Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

SCROLL FOR NEXT